उपक्रम
टाटा कॅपिटल व सुधागड रहिवासी सेवा संघ ठाणे यांच्या विद्यमाने शाळेस मिळालेली मदत
१ विज्ञान प्रयोगशाळेतील साहित्य , फर्निचर व प्रयोगशाळा दुरुस्ती खर्च
२ मैदानी खेळासाठी डबलबार, सिंगलबार , शिडी ,हॉलीबॉल , लांबउडी , मल्लखांब , पोळ व साहित्य
३ स्वच्छतागृह बांधकाम रु ....
४ वाचनालयासाठी पुस्तके व कपाट
५ वाचन कोपरा
६ कोरोना महामारीत ऑक्सिमीटर , थर्मोमीटर , सॅनिटायझर स्टॅन्ड ,
७ पितृछत्र हरपलेल्या , दिव्यांग व गरीब गरजु विद्यार्थ्यांना दरवर्षी शैक्षणिक साहित्य व परीक्षा फी
८ इ. ९ वी मध्ये शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षा फी
९ इ. १० वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना क्रमिक पुस्तके व वह्या
१० बोलक्या भिंती व विद्यालयाच्या रंगरंगोटीचा खर्च रु .२०,०००
११ निसर्ग - चक्रीवादळात नुकसान झालेल्या शालेय इमारतीच्या दुरुस्तीसाठी रु . ची आर्थिक मदत
१२ इ. लर्निंग डिस्प्ले युनिट सोबत इ .८ वी ,९ वी ,१० वी साठी अभ्यासक्रमाचे सॉफ्टवेअर अडॅप्टर बॉक्स सोबत
तालुकास्तरीय उपक्रम
१ क्रीडा स्पर्धांचे आयोजन, बक्षीस वाटप तसेच खेळाडू व संघ व्यवस्थापक यांचा प्रवास खर्च
२ डॉ. होमीभाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षा (NTS ,NMMS ) माध्यमिक व
३ पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इत्यादी परीक्षेसाठी फी. पुस्तके, मार्गदर्शन व प्रवास खर्च
४ निबंध, वक्तृत्व , सामान्यज्ञान , चित्रकला या स्पर्धांचे आयोजन व प्रवास खर्च
५ इंग्रजी भाषा समृद्धीसाठी तर्खडकर भाषांतर पाठमाला पुस्तके व शिकवणी वर्ग स्पर्धेचे आयोजन व प्रवास खर्च
६ सैनिक भरतीपूर्व प्रशिक्षण (युवक व युवती यांना) मेस्का अकॅडमी सातारा
आपली संस्था प्रतिवर्षी ठाणे शहरात विविध तालुक्यातील ग्रामीण भागात विविध उपक्रम सातत्याने राबवित आहे. संस्थेचे हितचिंतक/देणगीदार या नात्याने त्याची पूर्ण माहिती असावी यासाठी संस्थेच्या विविध उपक्रमांपैकी काही निवडक उपक्रमांची माहिती आपणास देत आहोत.
1)वार्षिक क्रीडा महोत्सव :- प्रतिवर्षी 26 जानेवारी(प्रजासत्ताक दिन) रोजी श्री मावळी मंडळ, ठाणे येथे भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन.
2) श्री सत्यनारायणाची महापूजा :- प्रतिवर्षी संस्थेच्या कार्यालयात श्री सत्यनारायणाची महापूजा व त्यानिमित्त सुधागड तालुका रहिवासी महिला मंडळ, ठाणे यांचेवतीने हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात येते.
3) मोफत नेत्र चिकित्सा शिबिर :- प्रतिवर्षी वार्षिक क्रीडामहोत्सवाचे औचित्याने श्री मावळी मंडळ, मैदान येथे नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन व अल्पदरात चष्मे विक्री करण्यात येते.
4)नववर्ष (गुढीपाडवा) स्वागत यात्रेत सहभाग : श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक मंडळ, ठाणे आयोजित.
5) मोफत वह्यावाटप :- प्रतिवर्षी ठाणे शहरातील गरीब, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात येतात तसेच आर्थिक मदत करण्यात येते.
6) विद्यार्थी गुणगौरव सोहळा :- माध्यमिक, उच्चमाध्यमिक, पदवीधर तसेच इतर क्षेत्रातील विशेष प्राविण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव
7) शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शन शिबिर :- भविष्यात योग्य व अचूक वाटचाल करण्यात यावी यादृष्टीने विविध क्षेत्रातील मान्यवरांतर्फे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येते.
8) विद्यार्थी गुणगौरव समारंभात सहभाग :- तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा श्री क्षेत्र पाली येथे प्रतिवर्षी होणाऱया गुणगौरव सोहळ्यात संस्थेचा सहभाग असतो.
9) मोफत आरोग्य चिकित्सा शिबिर :- प्रतिवर्षी तालुक्यातील विविध ग्रामीण भागात आरोग्य चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात येते, तसेच शिबिरातील शस्त्रक्रियेची नितांत गरज असलेल्या रुग्णांचा संस्थेचे वैद्यकीय सल्लागार डॉ. श्रीपाद बोडस यांचे विशेष सहकार्याने व मार्गदर्शनाने संस्थेतर्फे शस्त्रक्रियेचा खर्च करण्यात येतो.
10) समाजकार्याची आवड अधिकाधिक उत्पन्न व्हावी यादृष्टीने मान्यवरांचे उपस्थित मार्गदर्शन करण्यात येते.
11) तालुक्यातील शेतकऱयांनी शेतजमीनी विकू नये त्यामुळे पुढील परिणामांची जाणीव करण्यासाठी पत्रके काढून ते प्रत्येक गावात घरोघरी वाटण्यात येते.