आपला सुधागड तालुका
वास्तविक सुधागड तालूका म्हणजे पाली तालूकाच होय. पाली हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. पण हा तालूका ज्या भोर संस्थानात पूर्वीपासून होता, त्या भोरच्या राजे साहेबांची कुलस्वामिनी ‘भोराईदेवी’ ही तालुक्यातील सुधागड किल्ल्यावर असल्यामुळे या तालुक्याला सुधागड असे नाव प्राफ्त झाले. श्री छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधानांमध्ये स्वराज्याची राजधाली रायगड करावी की सुधागड या विषयी पुष्कळ चर्चा झाली होती. इतके ऐतिहासिक महत्व या किल्ल्याला आहे. सुधागड तालुक्यात श्री शंकराची जी चार प्राचीन मंदिरे आहेत त्यांची यात्रा चारधाम यात्रा म्हणून मानली जाते. श्रीविरेश्वर, श्री उत्तरेश्वर, श्री सिद्धेश्वर व श्री रामेश्वर ही देवालये तालुक्यात आहेत. अष्टविनायक म्हणून प्रद्धि असलेल्या यात्रेत श्री बल्लाळेश्वर हे देवस्थानही या तालुक्यात आहे.
सह्यादीच्या डोंगरकुशीत लपलेला व निसर्गसौंदर्याने नटलेला आपला सुधागड तालूका हा भौगोलिकदृष्टÎा रायगड जिह्याचे मधोमध वसलेला आहे. एखाद्या केंदणात हिरा शोभावा अशीच जणू सुधागडची रचना प्रकृतीने केली आहे. सुधा म्हणजे अमृत आणि या अर्थाला साजेशी अशी जी गोडी आपल्या तालुक्याच्या एकंदरीत सर्व वैशिष्टÎांमध्ये आहे.
सुधागड - भौगोलिक
तालुक्यात भ्रमंती करायची म्हणजे तालुक्याचा भूगोल व इतिहास समजून घेणे महत्वाचे आहे. रायगड जिह्याच्या मधोमध वसलेल्या या तालुक्याची दक्षिणोत्तर लांबी 32 किमी व पूर्व-पश्चिम रुंदी 23 किमी असून क्षेत्रफळ 405 चौ. किमी आहे. तालुक्यात 96 गावे व 160 वाडÎा-पाडे असून सध्याची लोकसंख्या सुमारे ...... एवढी आहे. बहुतांश लोकसंख्या मराठा समाजापैकी असून 30… लोकसंख्या कातकरी, ठाकूर व धनगर या अनुसूचित जमातीची आहे. बहुजन समाज हा शेतकरी व कष्टकरी आहे. सुधागड तालुक्याच्या पूर्वेला मावळ, पश्चिमेला पेण-रोहा, दक्षिणेला माणगाव तर उत्तरेला खालापूर तालूके आहेत. तालुक्यात नाडसूर, पाच्छापूर, नागशेत, कोशिंबळे, महागाव, ताडगाव, माणखोरा हे बारमाही वाहतुकीचे रस्ते आहेत. तालूका डोंगराळ दुर्गम असला तरी बहुतांश खेडी रस्त्याने जोडली गेली आहेत. तालुक्यातून अंबा, वळकी, दातपाडी व कुंडलिका या बारमाही वाहणाऱया नद्या आहेत. तालुक्यात काळा खडक (बेसाल्ट) मोठÎा प्रमाणात आढळतो. नैसर्गिक आश्चर्याची बाब म्हणजे ताडगाव-पडसरे व उसर या दोन्ही डोंगर मध्यावरील जंगलातून बारमाही स्वच्छ पाण्याचे झरे वाहत असतात.
तालुक्याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान 3000 ते 3500 मी. मी. असून मे महिन्यात सर्वाधिक सरासरी दैनिक तापमान 35 से. पर्यंत नोंदवले गेले आहे. तालुक्यात 58,00 हेक्टर्स जमिनीमध्ये भाताचे पिक 1200 हेक्टर्स वरकस जमिनीमध्ये नाचणी, वरी ही पिके घेतली जातात. याखेरीज वाल, मुग, चवळी इ. कडधान्येही पिकवली जातात. उन्हेरे, कवेले, ढोकशेत, कोंडगाव आणि घोटवडे या लघु पाटबंधाऱयांमुळे 500 हेक्टर्स भाताचे क्षेत्र दुपिकी झाले आहे. विविध शासकीय योजना आणि काही व्यक्तींच्या प्रयत्नांमुळे तालूका हरितक्रांतीच्या दृष्टीने वाटचाल करीत आहे.
सुधागड तालूका - ऐतिहासिक
घाटमाथ्यावरून कोकणात उतरताना प्रमुख ठिकाणी पोहोचण्यापूर्वी ज्या भागात तळ द्यायचा त्याला ‘पाल’ पडणे म्हणजे ‘तळ पडणे’ असे म्हणत. सुधागड तालुक्यातील ज्या ठिकाणी असे मोठे तळ पडायचे त्या ठिकाणाला ‘पाली’ असे नाव पडले. रायगडला राजधानीचा मान मिळण्याआधीपासून छत्रपतींनी राज्यविस्तारासाठी या तालुक्यातून प्रयाण केले होते. त्याच काळात सुधागड किल्ल्याचे महत्व वाढीस लागले. तत्कालिन भोर संस्थानमध्ये विचित्रगड, राजगड, प्रचंडगड, गौनगावळ व सुधागड हे पाच तालूके होते. यौपकी सुधागड हा एकमेव कोकणातील तालूका भोर संस्थानमध्ये समाविष्ट होता. संस्थानचे काळात सुधागड तालुक्याची स्थिती चांगली नव्हती. संस्थानचा सर्व भाग पुणे जिह्यात असल्यामुळे संस्थानिकांचासुद्धा तालुक्याशी फारसा संबंध येत नसे. “भारत छोडोह्ण आंदोलनामध्ये पाली गावात सत्याग्रह करण्यात आले होते. त्याचबरोबर संस्थाने स्वराज्यात सामील करण्यासाठीही आंदोलने होऊ लागली. जनआंदोलनाच्या अशा परिस्थितीत भोर संस्थानचे अखेरचे पंत श्रीमंत बाबासाहेब यांनी लोकमत प्रमाण मानून संस्थान विलिनीकरणासाठी कोणतेही आढे-वेढे घेतले नाही. यामुळे भोर संस्थान खालसा करण्यात येवून 8 मार्च 1948 रोजी स्वतंत्र भारतात विलीन करण्यात आले. सरकारच्यावतीने कै. साळवी यांनी प्रशासक म्हणून सुधागड तालुक्याचा पदभार स्वीकारला व स्वतंत्र भारताचा तिरंगा विद्यमान पोलीस स्टेशनसमोर डौलाने फडकविला.
भोर संस्थानातील निरनिराळ्या खातांकडील एकूण 21 लाख जमेपैकी सुधागडचा हिस्सा म्हणून रु. 8 लाख मुंबई सरकारने जिल्हाधिकारी, अलिबाग यांचेकडे वर्ग केले. याच रकमेतून पालीचा पूल, हरिजन वसतीगृह, जांभूळपाडा पूल व काही सार्वजनिक विहिरीची बांधकामे करण्यात आली. सन 1962 साली पंचायत राज्य व्यवस्थेची निर्मिती झाल्यावर सुधागड पंचायत समितीचे पहिले सभापती नवघरचे न. ल. चव्हाण आणि रायगड जिल्हा परिषदेचे पहिलेचे अध्यक्ष म्हणून पालीचे के. गो. तथा दादासाहेब लिमये यांची निवड झाली. सुधागड तालुक्याला कबड्डी खेळाची वैशिष्टÎपूर्ण परंपरा असून येथील पोटलज खुर्द या गावातील रामचंद्र येसू हुले व सिताराम नाना हुले यांनी अखिल भारतीय पातळीवर कबड्डी खेळण्याचा मान मिळविला आहे. सुप्रसिद्ध ज्येष्ठ सिने अभिनेत्री आशा काळे यांचे बालपण पाली या गावात गेले. श्री. नामदेव येसू खैरे यांनी पंचायत समिती सुधागडचे सलग 15 वर्षे सभापतीपद सांभाळले. तालुक्यातील गावांमध्ये देवदेवतांचे उत्सव उत्साहाने साजरे होतात, यानिमित्ताने ग्रामीण भागात नाटकांचे आयोजन करण्यात येते. चातुर्मासात ग्रामस्थ अध्यात्मिक ग्रंथांचे वाचन करतात. सामाजिक नितिमत्ता प्रस्थापित करण्याच्या बाबतीत तालुक्यात वारकरी संप्रदायाचे कार्य मोलाचे आहे.