इतिहास
सन 1962 च्या दरम्यानचा काळ पाहता ठाणे शहर हे एक आशिया खंडातील सर्वात मोठे औद्योगिक विभाग असलेले शहर होते. त्यच अनुषंगाने ठाण्यामध्ये नोकरी-धंद्यानिमित्ताने बाहेरील लोकांची संख्या वाढली. त्यामध्ये प्रामुख्याने चंदनवाडी व पाचपाखाडी परिसरात सुधागड तालूका, जि. रायगड या आपल्या तालूकावासियांची वस्ती जास्त होती. मुंबई येथे सुधागड तालूका रहिवासी सेवा संघटना होतीच. परंतु ठाणे येथे राहणारे श्री. दाजी भुजाबा दगडे, श्री. पांडुरंग शहाजी मांढरे, श्री. बाळाराम धोंडू भुरे, जयराम दळवी, श्री. कै. कृष्णा अफ्पा साळुंके इत्यादी तालुकावासियांनी एकत्र येऊन ठाण्यामध्ये सुधागड तालुक्याची संघटना स्थापन करण्यासाठी रहिवाशांच्या गाठीभेटी घेणे, आपली संघटना केल्याने होणारे फायदे समजावून सांगितले. त्यावेळच्या अशिक्षित बहुसंख्य लोकांना एकत्र आणून समजावून सांगणे प्रत्येक ठिकाणी पायी फिरणे, लोकांचया अडचणी जाणून त्यांना मदत करणे असे फार कठीण काम त्यांनी करून श्री. शंकर दाजी दगडे, श्री. शंकर नारायण गोळे, रघुनाथ खोले, श्री. वसंत सागळे, श्री. भगवानशेठ कुडले, श्री. रघुनाथ दळवी, श्री. गजानन रामकृष्ण गोफण, श्री. नाना साधुराम दळवी इत्यादी होतकरू मंडळींना बरोबर घेऊन दि. 1 मे 1976 रोजी सुधागड तालूका रहिवासी संघ(रजि.) नोंदणीकृत संस्थेचे पहिले अध्यक्ष माननीय श्री. पांडुरंग शहाजी मांढरे यांनी भूषविले. त्यावेळच्या काळामध्ये श्री. पांडुरंग मांढरे हे एक सुशिक्षित तरुण होते. त्यांनी संस्था रजिस्टर करण्यासाठी खूप मेहनत घेतली. त्यांच्या खांद्याला खांदा लावून कै. श्री. शंकर लावून कै. श्री. शंकर नारायण गोळे यांनी संस्थेची घटना लिहिण्यास मदत केली. सुधागड तालूक्यातील रहिवाशांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कला व क्रीडा यांच्या विकासासाठी काम करणारी व झटणारी असावी याबद्दलच्या तरतूदी घटनेत लिहून राजकारणापासून कशी दूर ठेवावी हे लिहिण्यास विसरले नाहीत. वरील मंडळींनी सुधागड तालूका रहिवासी सेवा संघ, ठाणे ही संघटनेचा पाया रचून सुधागडच्या रहिवाशांना सामाजिक कार्याचा वारसा दिला त्याबद्दल आपण सर्व त्याचे ऋणी आहोत.
सन 1980 च्या संस्थेच्या ध्येय धोरणांप्रमाणे गरीब व गरजू मुलांना पुस्तके व वह्या वाटप करणे, हुशार मुलांचा सत्कार करणे, सुधागड तालुक्यामध्ये गावोगावी रस्ते करणेबाबत सरकार दरबारी आवाज उठविणे, ठाणे-पाली एस. टी. बस चालू करणे. तसेच मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सुधागड तालुक्यातील कलाकारांचे नाटक गडकरी रंगायतन येथे लावणे इत्यादी कामे करण्यासाठी मा. श्री. शंकर (भाई) दगडे यांनी नियमितपणे देणगी देऊन सहकार्य केले व संस्थेची आर्थिक बाजू सांभाळली. संस्थापक व सभासद व त्यावेळचे तरुण सरचिटणीस आत्माराम खरीवले, विश्वास गोफण, सदाशिव लखिमले यांच्या सहकार्याने केले. कै. श्री. शंकर गोळे, श्री. सखाराम जाधव, श्री. दत्तात्रय पोळेकर, कै. श्री. बाळाराम बेलोसे, कै. श्री. बाळाराम दुर्गे यांनी संस्थेचे कार्यालय असावे म्हणून चंदनवाडी येथे एक 30ƒ12 फुट झोपडी विकत घेण्यास सहकार्य केले. त्यावेळच्या कार्यकारी मंडळाने व संस्थेच्या हितचिंतक मंडळाने पैसे जमवून चंदनवाडी रायगड गल्ली येथसील झोपडीची जागा घेऊन त्याचे कार्यालयात रुपांतर केले. म्हणूनच आज आपल्याला सरोवरदर्शन सोसायटी, रायगड लेन येथे आजचे संस्थेचे कार्यालय मिळाले आहे हे या काळातील कार्यकारी मंडळ व हितचिंतकांनी केलेले मुख्य काम आहे.
श्री. शंकर नारायण गोळे यांनी सुमारे 15 वर्षे संस्थेची धुरा सांभाळली. सन 1995 च्या दरम्यान श्री. शंकर गोळे हे हृदयविकारामुळे अंथरुणाला खिळले. त्यावेळचे कार्याध्यक्ष दत्तात्रय काळभोर यांच्याकडे हंगामी अध्यक्ष म्हणून कार्यभार सोपविण्यात आला. त्यांनी एक वर्ष हे काम पाहिले. सन 1996-97 श्री. शंकर (भाई) दगडे (माजी नगरसेवक - ठामपा) यांनी या काळात संस्थेचे अध्यक्षपद भुषविले. नियमित कार्याबरोबर श्री. दगडे यांनी संस्थेतर्फे चंदनवाडी येथे होणारा वार्षिक कबड्डी महोत्सव मावळी मंडळ, चरई, ठाणे येथे भव्य पटांगणात घेण्याचे योजून त्यास भव्य क्रीडा महोत्सवाचे स्वरूप दिले. तसेच आपल्या ठाणे शहरातील परिचयाचा फायदा घेऊन ठाण्यातील दानशूर लोकांकडून देणगी मिळवून दिल्या. सन 1998-2004 या काळात श्री. सुर्यकांत देशमुख यांच्याकडे संस्थेची सुत्रे आली. या काळात संस्थेकडे सर्वश्री. सदाशिव लखिमले, विठ्ठल खेरटकर, गणपत सितापराव, विठ्ठल घाडगे, शिवाजी दळवी, गोपीनाथ दुर्गे, विश्वास गोफण, प्रवीण तेलंगे, रघुनाथ दळवी, वसंत लहाने, अनिल सागळे, चंद्रकांत नारायण चव्हाण, हनुमंत थोरवे, वसंत लहाने, आत्माराम खरीवले, कै. सुभाष शिंदे इत्यादी सुशिक्षित कार्यकर्ते होते. त्यास जोड म्हणून मा. श्री. अशोक टिळकसर, श्री. रजनीकांत देशमुख, श्री. अशोक मोडक(आमदार) यांचे मोलाचे सहकार्य लाभले. परिचारिका शिक्षण वर्ग काढण्यासाठी संस्थेने गावोगावी जावून 10 वी पास किंवा नापास मुलींना परिचारिकेचे शिक्षण देणे गरजेचे आहे व त्यांचे भवितव्य घडविण्यासाठी तालुक्यातील शेतकऱयांना समजावून सांगितले. तालुक्यातील मुलींची प्रगती व्हावी त्यांना मोफत व माफक दरात शिक्षण मिळावे ही इच्छा होती. पदवीधर मंच, श्री. बल्लाळेश्वर ट्रस्ट यांच्या सहकार्याने सुमारे 1 लाख रुपये उपलब्ध करून परिचारिका प्रशिक्षण वर्ग चालविण्याच्या उपक्रमाला चालना दिली. सध्या हा परिचारिका प्रशिक्षण वर्ग पाली येथे बल्लाळेश्वर लोकविद्यालय चालवित आहे. संस्थेच्या दृष्टीने ही समाधानाची बाब आहे.
वरील काळात संस्थेचे चंदनवाडी विभागाबरोबर संस्थेच्या कार्यालयाची जागा विकसित करण्यासाठी ठाणे महापालिकेतर्फे विकासकांकडे देण्यात आली. ठाणे महापालिका आणि विकासक यांच्याकडे एक हजार चौ. फुट जागेची मागणी केली. बरेच प्रयत्न, भेटीगाठी, मिटींग व कोर्ट कचेऱया केल्यानंतर सुद्धा संस्थेच्या 30ƒ12 फुट कार्यालयाच्या बदल्यात 14ƒ10 फुट चौ. फुटाचे कार्यालय मिळाले ही सर्वात खेदजनक बाब आहे. आपल्या संस्थेच्या सामाजिक विकासाला खिळ घालणारा हा प्रसंग होता. तसेच अनेक राजकीय, सामाजिक, आर्थिक, चढउतार अनुभवलेल्या या संस्थेत सन 2001 ते 2003 या काळातही काही कारणास्तव तळगाळातील जनसंपर्क दुरावल्यामुळे उत्साह दुरावला होता. अशा परिस्थितीतही संस्थेच्या काही जुन्या व नवीन सामाजिक कार्यकर्त्यांनी जोमाने जनसंपर्क व निर्धार श्री. विठ्ठल खेरटकर यांच्या अध्यक्षतेखाली केला. तसेच संस्थेची विस्कटलेली घडी अधिकाधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने श्री. चंद्रकांत नारायण चव्हाण यांच्या सुचनेप्रमाणे स्मरणिका प्रकाशन हा विक्रमी एककलमी कार्यक्रम राबविला. या कामी श्री. दीपक दळवी(संपादक दै. महाराष्ट्र जनमुद्रा) यांचे मोलाचे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्मरणिका प्रकाशनामुळे संस्थेच्या आर्थिक बाबीत सुधारणा होऊन कार्षिक कार्यक्रम करणे सहजसोपे झाले. संस्थेमध्ये मानाचे स्थान मिळालेल्या लोकांनी दुर जाऊन संस्था खिळखिळी करण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यास सर्व कार्यकर्ते यशस्वी झाले आहेत. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री. गोपीनाथ दुर्गे हे समर्थपणे आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी यशस्वी झाले. त्यानंतर संस्थेची धुरा विद्यमान अध्यक्ष श्री. विठ्ठल घाडगे यांच्याकडे आली असून त्यांनी संस्थेमध्ये तरुण कार्यकर्त्यांना वाव देत अधिक जोमाने कार्य करण्यासाठी व संस्थेच्या इमारत निधीसाठी पदाधिकाऱयांसह सर्व सदस्य तसेच संस्थेबाहेरील व्यक्तींचेही आर्थिक पाठबळ मिळवून कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत.ऑगस्ट 2016 मध्ये संस्थेचे सल्लागार श्री. विठ्ठल खेरटकर यांच्या सुचनेने प्रथमच सुधागडातील आदिवासी गाव-पाडÎातील मागास व पितृछत्र हरपलेल्या पाल्यांच्या शिक्षणाची जबाबदारी संस्थेने उचलून एकूण 118 विद्यार्थ्यांची शालेय फी त्या-त्या शाळांमध्ये जमा करून त्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटपही करण्यात आले. तसेच संस्थेचे सल्लागार श्री. गोपीनाथ दुर्गे, श्री. विठ्ठल खेरटकर, श्री. चंद्रकांत नारायण चव्हाण, श्री. प्रवीण तेलंगे, श्री. सुरेश शिंदे, श्री. दीपक दळवी, श्री. दत्तात्रय पोळेकर यांच्या मार्गदर्शनाने संस्थेची वाटचाल यशस्वीपणे सुरू आहे.