सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे तर्फे पितृछत्र हरपलेले व दिव्यांग विद्यार्थ्यांना मदत आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव संपन्न फास्ट जमान्यात इतरांसाठी झटणे यातच सुधागड तालुका संघाचे यश आहे - सुरेश मेश्राम प्रतिनिधी
ठाणे, दि. 14 ः सुधागड तालुक्यातील रहिवाशांच्या सेवेसाठी झटणार्या सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ आज फास्ट जमान्यात इतरांसाठी झटतेय यातच या संघाचे यश आहे. 47 वर्षात मोठे झालेला हा वृक्ष आज सर्वांना लाभ देतोय, याचं कौतूक वाटतं, अशा शब्दात सुधागड मित्र व समाजसेवक सुरेश मेश्राम यांनी सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाचे कौतूक केले. निमित्त पितृछत्र हरपलेल्या व दिव्यांग विद्यार्थ्यांना आर्थिक मदत वाटप व गुणवंत विद्यार्थ्यांना गौरव. ठाण्यातील सहयोग मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात सुधागड तालुक्यातील ठाणे शहरात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थी, पालक आणि तालुकावासियांनी मोठी उपस्थिती दर्शविली. ठाण्यातील सुधागड तालुकावासियांच्या सेवेसेसाठी कार्यरत असलेल्या सुधागड तालुका रहिवासी सेवा, ठाणे या संस्थेच्या विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी दहावी-बारावी, पदवी व विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्याचा गुणगौरव सोहळा व विद्यार्थी दत्तक योजने अंतर्गत शैक्षणिक आर्थिक मदत वितरण (पितृछत्र हरपलेला विद्यार्थी) आणि सत्कार समारंभाचे आयोजन रविवारी 13 ऑगस्ट 2023 रोजी सहयोग मंदिर घंटाळी येथे केले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सीटीचे अध्यक्ष चंद्रशेखर श्रीधर लिमये व समाजसेवक, सुधागड मित्र सुरेश मधुकर मेश्राम विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी दहावी-बारावी, पदवीधर विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला तर पितृछत्र हरपलेल्या 30 पालकांना विद्यार्थी दत्तक योजनेचा लाभ देण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल घाडगे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमात संस्थेचे शिक्षण समितीप्रमुख वसंत लहाने यांनी गेली 30 वर्षे संस्थेसाठी दिलेल्या भरीव योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर सुधागड आदर्श शेतकरी म्हणून श्री विठ्ठल बाबू सागळे (गांव भेरव) यांचा गौरव करण्यात आला. तसेच सुधागड युवा उद्योजक पुरस्काराने श्री गणेश या ज्ञानदेव दंत यांना गौरविण्यात आले. सुधागड तालुक्यासाठी सेवा देणार्या तालुक्याच्या बाहेरील व्यक्तींचाही सुधागडमित्र पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यामध्ये शारदाबाई मेडीकल ट्रस्टचे अजितभाई शहा, सौ.अंजली व श्री वसंत केळकर, श्री विजय तांबे यांना गौरविण्यात आले. यावेळी सुधागड तालुका मराठा समाज माजी अध्यक्ष गणपत सितापराव, समाजसेवक राजेश बामणे आदी मान्यवर व सुधागड तालुका रहिवासी महिला मंडळही उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल घाडगे यांनी मार्गदर्शन करताना म्हटले की, सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे ही संस्था गेली 47 वर्षे ठाण्यात वास्तव्यास असलेल्या सुधागड तालुकावासियांच्या विकासासाठी कार्यरत आहे. या दरम्यान, ठाणे शहरातील अनेक जुन्या जाणत्या मंडळींनी संस्थेत मोलाचे योगदान दिले आहे तर टाटा कॅपिटलच्या माध्यमातून संस्थेने सूधागडातील 14 शाळांना शैक्षणिक व क्रीडा साहित्य तसेच होमी भाभा विज्ञान, NMMS इत्यादी सर्व स्पर्धा परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना परीक्षा फी व पुस्तके रूपाने सहकार्य करीत आहे. संस्था सभागृह उभारणीसाठी प्रयत्नशील असून आजपर्यंत अनेक दानशूर व्यक्तींचे संस्थेला सहकार्य लाभत आहे. यापुढेही असेच सहकार्य राहिले तर लवकरच संस्थेची सभागृह उभी राहील तसेच नुकत्याच एका कार्यक्रमात शासनाकडेही संस्थेच्या सामाजिक भवन उभारणीसाठी मदतीचे आवाहन लेखी पत्राद्वारे करण्यात आले आहे. या कायर्र्क्रमासाठी उपस्थित मान्यवर, विद्यार्थी व पालकांचेही घाडगे यांनी आभार व्यक्त केले. दरम्यान या कार्यक्रमासाठी अध्यक्ष विठ्ठल घाडगे, उपाध्यक्ष शंकर काळभोरे, कार्याध्यच प्रकाश शिलकर, सरचिटणीस राजू पातेरे, चिटणीस अविकांत साळुंके, खजिनदार विजय पवार, उपखजिनदार विजय जाधव, ज्येष्ठ सल्लागार विठ्ठल खेरटकर, सल्लागार रमेश सागळे, शिवाजी दळवी, सुरेश शिंदे, सुधीर मांढरे, चंद्रकांत बेलोसे, गणपत डिगे, उपाध्यक्ष वसंत लहाने, हिशेब तपासनीस दत्तात्रय सागळे, सांस्कृतिक प्रमुख जनार्दन घोंगे, रघुनाथ इंदुलकर, संपर्कप्रमुख सुनिल तिडके, क्रीडा समितीप्रमुख राकेश थोरवे, अनिल सागळे, हरिश्चंद्र मालुसरे, गजानन जंगम,प्रणीव बामणे, मोहन भोईर, प्र्रसिद्धीप्रमुख अजय जाधव, सदस्य भगवान तेलंगे, अनिल चव्हाण, जयगणेश दळवी, बबन चव्हाण, पत्रकार दत्तात्रय दळवी, राहुल लहाने आदींचे विशेष सहकार्य लाभले.